राज्यात 13 उमेद मॉल उभारणार

वर्धा /2 जानेवारी : मॉल ही महानगरीय संस्कृती म्हटल्या जाते. पण आता लहान शहरात पण मॉल उघडत असून त्यास प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. ते पाहून ग्रामीण उत्पादने विकल्या जावीत म्हणून त्यासाठी स्वतंत्र मॉल शासनानेच उघडावी म्हणून विचार पूढे आला. महिला बचत गट ही संकल्पना वर्धा जिल्ह्यात यशस्वी ठरली असल्याने पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बचत गटाचे मॉल शासनाने उघडावी, अशी भूमिका मांडली. त्यास यश आले असून ग्राम विकास विभागाने तसा निर्णय आज घेतला आहे.
पूणे विभागात सातारा, पूणे व सोलापूर, कोकण – रत्नागिरी खेड, ठाणे अंबरनाथ, नाशिक – जळगाव, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव तुळजापूर, अमरावती – यवतमाळ व अकोला, नागपूर – वर्धा व नागपूर. असे 13 जिल्हे उमेद मॉल साठी निवडण्यात आले आहे.
राज्यातील महिला बचत गटाच्या उत्पादनस वाव मिळावा म्हणून तसेच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा आज निर्णय झाला. महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियान 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यात अंमलात येते. अभियानातील गट विविध वस्तूंचे उत्पादन करतात. त्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रदर्शनी आयोजित केल्या जात असतात. काही उत्पादने ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर पण उपलब्ध आहेत. मात्र या महिला गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यासाठी उमेद मॉल उभारण्याचा निर्णय झाला होता. पण जिल्हे निवडण्यात आले नव्हते. त्यासाठी निवड झालेले जिल्हे आज जाहीर करण्यात आले आहे.




