पैसे दिले तर बळी पडू नका
राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र

मुंबई /1 जानेवारी : राज्यातील 29 महापालिकांच्या निवड णुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता. 2 जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज गुरुवारी (ता. 1 जानेवारी) मनसेच्या उमेदवारांनी शिवतीर्थ येथे जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंची भेट घ्यायला मिळाल्याने आणि राज ठाकरेंकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे उमेदवार आनंदी होऊन शिवतीर्थाबाहेर येताना पाहायला मिळाले. परंतु, या भेटीवेळी ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना अत्यंत महत्त्वाचा कानमंत्र सुद्धा दिला. पैसे दिले तर त्या आमिषाला बळी पडू नका, असा महत्त्वाचा सल्ला राज ठाकरेंकडून उमेद वारांना देण्यात आला आहे. 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी मनसेच्या 53 उमेदवारांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र देत म्हटले की, तुम्हाला अनेक ऑफर येतील. पैशांचे आमिष दाखवले जाईल. मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. स्वतःचा अनुभव सांगतो, मलाही खूप ऑफर आल्या आहेत. पण मी सगळ्यांना पळवून लावले, असे यावेळी राज ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तसेच, मुंबई मराठी माणसाची आहे.




