अमरावती मनपा निवडणुकीची भविष्यवाणी तंतोतंत खरी
आपली मातृभूमीच्या वृत्ताची निवडणुकीदरम्यान चर्चेत

* मनपा राजकारणावर विश्लेषण
अमरावती/31 डिसेंबर : आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापलेले आहे. निवडणुकीपूर्वीच दैनिक ’आपली मातृभूमी’ने सर्व प्रमुख पक्षांचे प्रभागवार इच्छुक उमेदवार जाहीर केले होते. आणि आज अधिकृत यादी जाहीर होताच अंदाज 85 ते 90 टक्के अचूक ठरले. दैनिकातील अनेक वर्षांच्या अनुभवातून शहरातील राजकीय घडामोडीवर पकड स्पष्ट असल्याचे दिसून आले. तसेच नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतही ’आपली मातृभूमी’चे अंदाज शतप्रतिशत अचूक ठरलेले आहेत. निवडणुकी पूर्वी शहरवासीयांमध्ये उमेदवार आणि पक्षीय रणनीतीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती. अनेक दिवसांपासून विविध पक्षांमध्ये संभाव्य उमेदवारांची यादी, गुप्त बैठकांची चर्चा, युतींच्या शक्यतांचा अंदाज आणि प्रभागवार घडा मोडीची माहिती शहरात वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांना देत होतो. अशा परिस्थितीत, ’आपली मातृभूमी’ने आपल्या सखोल विश्लेषणातून संभावित उमेदवारांची यादी प्रकाशित केली होती, आज मंगळवारी अखेरच्या दिवशी प्रशिद्ध झालेली उमेदवारांची अधिकृत यादी जवळपास 85-90 टक्के खरी ठरली आहे.
काँग्रेसने आपले संभावित उमेदवार जाहीर करण्याआधी विशेष गोपनीयतेची काळजी घेतली होती. शहर काँग्रेस कमिटीने प्रभागवार उमेदवारांची माहिती बाहेर पडू नये म्हणून विविध पद्धतींचा वापर केला. मात्र, ’आपली मातृभूमी’ने 8-10 दिवस आधीच प्रभागवार यादी थोडक्यात प्रकाशित केली होती, आज प्रशिद्ध झालेल्या काँग्रेसच्या अधिकृत यादीशी जवळपास जुळली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ह्या यादीवर तर्क-वितर्क केला की, जर संभाव्य उमेदवारांची माहिती बाहेर आली, तर भाजपसह इतर विरोधी पक्षांचे उमेदवार बदलले जाऊ शकतात. तरीही, वृत्तपत्राच्या सखोल आणि स्वतंत्र पत्रकारितेमुळे ही माहिती वेळेवर लोकांपर्यंत पोहोचली. या अंदाजामुळे वृत्तपत्राच्या शोध पत्रकारितेची ताकद पुन्हा सिद्ध झाली आहे. काँग्रेसने उमेदवार निवडताना शहरातील धोरणात्मक स्थळे, समाजिक संघटनांचे संपर्क आणि क्षेत्रीय समीकरण यांचा विचार केला. यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि राजकीय वातावरणात स्थिरता आली. भाजपकडून संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच, ’आपली मातृभूमी’ने भाजप, शिंदे गट शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टी यांच्यातील युतीची शक्यता व चर्चांची माहिती प्रकाशित केली होती. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये धांदल उडाली होती. भाजपच्या पार्लियामेंटरी बोर्डच्या बैठकीत आणि स्थानिक पदाधिकार्यांच्या गुप्त बैठकीत ही माहिती चर्चेचा विषय ठरली. अनेक नेत्यांनी वृत्तपत्राशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला, ज्यावर ’आपली मातृभूमी’ने पत्रकारितेच्या स्वतंत्र अधिकाराचा उल्लेख केला. भाजपच्या अधिकृत यादीतही अनेक उमेदवार ’आपली मातृभूमी’ने आधीच दिलेल्या संभाव्य यादीशी जुळले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. स्थानिक नेत्यांमध्ये राजकीय रणनीती बदलण्याची चर्चा झाली, आणि युतीच्या निर्णयाचा तिढा अखेरपर्यंत कायम होता. अजित पवार गटाने मनपा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार निवडले. ’आपली मातृभूमी’ने प्रभागवार उमेदवारांची यादी अगोदरच प्रकाशित केली होती, आणि अधिकृत यादी जाहीर होताच अंदाज पूर्णपणे अचूक ठरला. या यशामुळे वृत्तपत्राची राजकीय समज, प्रभागवार विश्लेषण क्षमता आणि सखोल माहिती संकलनाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. राकांपा गटाने उमेदवार निवडताना स्थानिक जनतेचे हित, समाजिक संघटनांचे प्रभाव आणि क्षेत्रीय समीकरण यांचा विचार केला. ’आपली मातृभूमी’च्या अंदाजामुळे नागरिकांना गुप्त राजकीय प्रक्रिया आणि संभाव्य उमेदवारांची माहिती आधीच मिळाली, त्यामुळे मतदारांमध्ये जागरूकता आणि तयारी निर्माण झाली.भाजपसोबत युतीच्या चर्चांचा मागोवा ’आपली मातृभूमी’ने आधीच घेतला होता. या माहितीमुळे स्थानिक राजकारणात रणनीती निर्माण झाली. शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षाने आपल्या संभाव्य युती योजना आणि प्रभागवार रणनीती ठरवल्या होत्या. वृत्तपत्राने ही माहिती वेळेवर प्रकाशित केल्यामुळे स्थानिक नेत्यांना रणनीती ठरवताना समायोजन करता आले. आगामी मनपा निवडणुकीत मतदारांचे धोरण आणि तयारी ठरविण्यात महत्त्वाची ठरेल.




