भाजीबाजार चौकात पवन वानखेडे यांची निर्घृण हत्या

खोलापुरी गेट ठाण्यांतर्गत थरारक घटना

 * चार अज्ञात मारेकरी फरारमारेकरी फरार

* राजापेठ पोलीस खोलापुरी गेट पोलिसांच्या आधीच घटनास्थळावर दाखल

* नागरिकांमध्ये संतापाची लाट

अमरावती/15 डिसेंबर : शहरातील गजबजलेल्या भाजीबाजार परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेली धक्कादायक घटना संपूर्ण अमरावतीस हादरवून टाकणारी ठरली आहे. खरकाडीपुरा येथील रहिवासी पवन वानखेडे (वय-50) याची भाजीबाजार चौकात चाकूने हल्ला करून निर्घुण हत्या केली गेली. ही घटना फक्त एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण शहरावर भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पवन वानखेडे चौकात एकटे असताना अचानक तीन-चार युवकांनी त्यांच्यासोबत वाद घातला आणि वादाचे रुपांतर हल्ल्यात झाले. आरोपींनी त्यांच्यावर चाकूने जवळपास चार वार केले. या गंभीर जखमी अवस्थेत तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागला होता अशी चर्चा घटनेनंतर भाजीबाजार परिसरात मोठी रंगत होती. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून परिसराची बारकाईने पाहणी केली, तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके स्थापन केली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केला आहे. पोलीसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, ही हत्या जुन्या वादातून घडली आहे. सोमवारी पवन वानखेडे यांनी भाजीबाजार परिसरातील सार्वजनिक ठिकाणी नशा करणार्‍या काही युवकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नामुळे संतप्त आरोपी युवकांनी अचानक हल्ला करून पवन वानखेडे यांची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर भाजीबाजार परिसरात नागरिक आणि दुकानदार भयभीत झाले होते. घटनेच्या वेळी काहींनी तातडीने व्यवसाय बंद केला, तर काहीजण घराबाहेर निघालेच नाहीत. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजीबाजार सारख्या गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी ही घटना शहरवासीयांसाठी धक्कादायक ठरली आहे. दुकानदार आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून, शहरातील हिंसाचाराची गंभीर स्थिती अधोरेखित झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढत चाललेल्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पोलीस उपस्थिती वाढवणे आणि घटनांवर वेगवान कारवाई करणे ही काळाची गरज आहे. अमरावतीतील ही घटना फक्त पवन वानखेडे यांच्या कुटुंबियांसाठीच नाही, तर संपूर्ण शहरासाठी धक्कादायक ठरली आहे. शहरातील नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. पोलीस तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेणे आणि त्यांना लवकरच न्यायाच्या चौकटीत आणणे हे प्रशासनासमोर उभे असलेले मोठे आव्हान ठरले आहे. पवन वानखेडे यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण शहरवासीयांच्या मनावर धक्कादायक परिणाम केला आहे. भाजीबाजारसारख्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे आता प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाढत चाललेल्या हिंसाचारावर नियंत्रण आणणे, पोलीस उपस्थिती वाढवणे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही प्राथमिकता असावी, असे तज्ज्ञ सांगतात.

संबंधित बातम्या

Back to top button