नागपूर अधिवेशनात यशवंत स्टेडियम येथे 30
मागण्यांबाबत शासनाकडे तात्काळ आ.रवी राणा करणार निर्णयाची मागणी

अमरावती /14 डिसेंबर : यशवंत स्टेडियम येथे राज्याच्या विविध कानाकोपर्यातून आलेल्या आंदोलकांची आज आ.रवी राणा, उमेश ढोणे, अजय घुले, प्रकाश साबळे, शुभम उंबरकर, राजू चुनकीकर, प्रकाश खर्चान, शंकर डोंगरे, मोहन चव्हाण, मंगेश पाटील इंगोले,आदींनी भेट घेण्यात आली. यावेळी महादेव कोळी समाज, तांडा वस्ती पाडे, प्राथमिक वस्तीशाळा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आपले सरकार सेवा केंद्र, बेंबळा नदी प्रकल्पातील शेतकरी, शालार्थ शिक्षक संघर्ष समिती, पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया, संगणक तज्ञ, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक तसेच आदिवासी सामाजिक संस्थांच्या, धोबी समाज यांची मागणी, बळीराजा प्रकल्प ची मागणी, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू करा,या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांची आ.राणा यांना निवेदने सादर केली.प्राप्त झालेली सर्व निवेदने संबंधित मंत्री तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लावून सादर करण्यात आली आहेत. या मागण्या न्याय्य असून शासनाने त्यांचा तात्काळ व सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. आंदोलकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या संबंधाने आज विधानसभेतही मागणी करणार आहेत.




