तिसर्या परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलनात होणार 10 ग्रंथांचे प्रकाशन

अमरावती /11 डिसेंबर : मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, परिवर्तन प्रबोधिनी, इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स व बिलीव्ह फाउंडेशन द्वारा आयोजित तिसर्या अमरावती जिल्हा परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलनामध्ये जिल्ह्यातील दहा नामवंत साहित्यिकांच्या दहा साहित्यकृतींचे प्रकाशन साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या संमेलनामध्ये प्रकाशित होणार्या पुस्तकांमध्ये ज्ञानपथ पब्लिकेशन प्रकाशित अशोक काळे यांच्या ’काही कडू, काही गोड, नूतन शेखर देशमुख यांच्या ’दिलसे लिखी बाते’, सौ नेहा भटकर यांच्या ’गाव अंकुरे अंकुरे’ मेधा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित उद्धव शहाणे लिखीत ’विचलित’ कादंबरीचे, डॉ.श्यामसुंदर निकम लिखित ’कटाक्ष’ काव्यसंग्रहाचे, सुशीला मळसने लिखीत डॉ.पंजाबराव देशमुख काव्यस्पंदने या संपादित ग्रंथाचे, कीर्ती पातुर्डे यांच्या ’आठवणी’ काव्यसंग्रहाचे, अक्षरशील्प प्रकाशन तर्फे प्रकाशित प्रा.संजीवनी काळे यांच्या ’अंतरीची स्पंदने’ या काव्यसंग्रहाचे, गजानन देशमुख यांच्या ’हे राम’, हर्मीश प्रकाशन पुणे, डॉ सुभाष गवई यांच्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रह’ याग्रथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच या सर्व मान्यवर लेखकांचा व प्रकाशकाचा यावेळी भावपूर्ण सत्कार देखील करण्यात येईल.




