विदर्भातील जनतेचा विश्वासघात करु नका

...फक्त हुरडा खायला येतात

* सुधीर मुनगंटीवार यांचा आपल्याच सरकारवर प्रहार

नागपूर /10 डिसेंबर :  शासकीय निधीवाटपात असमतोल असून विदर्भातील जनतेचा विश्वासघात करु नका, अशी तोफ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर डागली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी अनेकदा मागणी करुनही गेल्या पाच वर्षात वैधानिक विकास महामंडळांची स्थापना राज्य सरकारने न केल्याने मुनगंटीवार यांनी संपात व्यक्त केला. विदर्भात पाणी पिऊन आणि हुरडा खाऊन बर्फाच्या चाकूने खून करुन जाणार आहे का, असा सवाल करीत विदर्भातील जनतेला न्याय देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी विधानसभेत आपली संतप्त भूमिका मांडताना केली. विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी एका संगीत कार्यक्रमात एक दिन बिक जाएगा, माती के मोल, हे गाणे म्हटले होते. त्याचा संदर्भ देत आता एक दिवस जायचेच आहे, मग कुणाला दबून का रहायचे? विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी काम करीत राहणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. वैधानिक विकास मंडळांची मुदत 30 एप्रिल 2020 रोजी संपली असून त्यानंतर त्यांनी स्वतः, अशोक चव्हाण, नितीन राऊत, मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकारला पत्रे पाठवून वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेची मागणी केली. पण वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्तावच पाठविण्यात आलेला नाही, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Back to top button