वृक्षारोपणातूनच हरित आणि सुरक्षित भविष्य घडेल

आ. प्रविण पोटे पाटील यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो झाडांचे वृक्षारोपण

अमरावती/26 जुलै : मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा दशक अभियान अंतर्गत आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिंग रोड, पोटे पाटील रोड, कठोरा परिसरात वड व पिंपळ या पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार प्रविण पोटे पाटील म्हणाले, वृक्षारोपण ही केवळ एक औपचारिकता नसून भावी पिढ्यांसाठी आपण ठेवत असलेली अमूल्य ठेव आहे. वड आणि पिंपळ यांसारखे वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. वृक्षारोपणातूनच हरित, समृद्ध आणि सुरक्षित भविष्य घडेल त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर हरित, प्रदूषणमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र घडविणे शक्य होईल. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. एक झाड… एक जबाबदारी या संकल्पनेतून उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या प्रसंगी आ. राजेश वानखडे, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, चेतन पवार, नितीन गुडधे तसेच परिसरातील नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button