नेपाळमधील पुरानंतर भयानक स्थिती : 320 भारतीय अद्याप बेपत्ता

अडकलेल्या शेकडो भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून युध्दस्तरावर प्रयत्न

पररराष्ट्र मंत्रालयाने सांगितला चिंता वाढवणारा आकडा

काठमांडू /28  ;ऑगस्टनेपाळमधील पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, नेपाळमधील पुरानंतर नेपाळ आणि कैलाश मानसरोवरमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले शेकडो भारतीय नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नेपाळमधील पुरानंतर आतापर्यंत सुमारे 320 भारतीय नागरिकांपर्यंत संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. याशिवाय आणखी 100 भारतीय वंशाचे परदेशी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण क्षमतेने चालवले जात आहे. तसेच तामिळनाडूमधील 21 भारतीय नागरिक काठमांडू येथून दिल्लीमध्ये सुखरूपपणे पोहोचले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. याबरोबरच त्रिशुली वन हायड्रोपॉवर प्रोजेक्टमध्ये काम करत असलेल्या 63 भारतीय नागरिकांनाही सुखरूप वाचवण्यातआले आहे. तसेच चीनच्या सीमेवर अडकलेल्या 96 भारतीय नागरिक सुरक्षितपणे नेपाळच्या सीमेमध्ये दाखल झाले आहेत. या सर्व नागरिकांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीनंतर नेपाळमधील परिस्थिती चिंताजनक बनलेली आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने 320 भारतीय नागरिकांसोबत संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती दिली आहे. याशिवाय कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेले भारतीय वंशाचे सुमारे 100 परदेशी नागरिक बेपत्ता झाले आहेत. या सर्व नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळ प्रशासनाकडून सातत्याने समन्वय साधला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button