आगीत होरपळून मामा-भाचीचा मृत्यू

अकोल्याच्या अडगाव बु. गावातली दुर्दैवी घटना

अकोला/12 फेब्रुवारी -अकोल्यातून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अडगाव बुज्रुग गावात आज रात्री एका घराला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागलेली असताना अचानकपणे मोठा पाठोपाठ स्फोट झाले आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. चव्हाण नामक व्यक्तीच्या घरा ही आग लागली होती. घरात ज्वलनशील पदार्थ अर्थातच पेट्रोल आणि डिझेलचा साठा साठवून ठेवला होता. त्यामुळेच पाठोपाठ स्फोट झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविला जात होता.
आग लागल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांना मिळताच मोठी गर्दी या ठिकाणी जमली. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांकडून अथक प्रयत्न सुरु होते. घरात काही सदस्य अडकून असल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांनी घरातील सदस्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. थोड्या वेळातच तिघांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी घरातील गंभीर स्वरूपात आगीत होरपळले गेले. या जखमींना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपरार्थ दाखल करण्यात आलंय. मात्र, उपचारा दरम्यान दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येती आहे. ही आग इतकी भीषण होती की शेजारील घर देखील आगीच्या आटोक्यात आले..

संबंधित बातम्या

Back to top button