वडाळी उद्यानाचे रुपडे बदलणार

महापौर श्रीचंद तेजवाणी यांची प्रकल्प पाहणी

अमरावती /9 एप्रिल: महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी गुरुवार, 9 एप्रिल 2026 रोजी वडाळी उद्यानाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा व आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वडाळी उद्यानात राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये विविध आकर्षक व उपयुक्त घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिस्ट्री गार्डन, फूड कोर्ट एरिया, फ्लॉवर गार्डन, ग्रीन जिम, कॉनटूर लॉन, सायकलिंग ट्रॅक, फाऊंटेन, चिल्ड्रन प्ले एरिया तसेच साहसी उपक्रमांसाठी विशेष जागा विकसित करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग एरिया, ‘वाइल्ड अ ग्लो’ गार्डन, मेझ गार्डन, जिने , दिव्यांगांसाठी रॅम्प, तसेच सुंदर तलाव (ङरज्ञश) यांचाही प्रकल्पात समावेश आहे. या सर्व सुविधांमुळे वडाळी उद्यान हे शहरातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी संबंधित अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांसाठी अधिक हिरवळ, आरोग्यदायी वातावरण आणि विरंगुळ्याचे उत्तम साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणी दौर्‍यात सभागृह नेते चेतन गावंडे, सन्मा.नगरसेविका ममता आवारे, पंचफुला चव्हाण, सन्मा. नगरसेवक विक्की उर्फ विशाल वानखडे, सैय्यद राशद अली, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, माजी महापौर अशोक डोंगरे तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button