संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरात भक्तीचा जागर

गणेशभक्तीने सजले सिकवालपुरा परिसर

अंगारिकेच्या मंगल प्रारंभाने भाविकांमध्ये उत्साह

अमरावती /29 सप्टेंबर- सिकवालपुरा येथील श्री ऋद्धी-सिद्धी विनायक मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त विशेष अभिषेक, पूजन आणि महाआरतीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणेश मंदिर उत्सव समितीच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्यात आनंद व्यास, सीमा व्यास तसेच भेरडे दांपत्याने गणेशाचा अभिषेक केला. यावेळी भाविकांनी आरती करून गणरायाचे आवाहन केले. गणेशभजनांनी परिसर भक्तिमय झाला. अंगारिका संकष्टीच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमाला महिला भाविकांसह समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरू होती. पूजनानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण राहिले. पंडित योगेश शर्मा यांनी पंडित बद्रीलाल व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चार केले. प्रसाद वाटपाच्या व्यवस्थेत आनंद गोकुळ प्रसाद व्यास यांनी सहकार्य केले. यावेळी बाबूलाल उपाध्याय, किसन व्यास, विजयकुमार ओझा, आत्माराम उपाध्याय, सुरेश पांडे, ओमप्रकाश कोलरिया, आनंद व्यास, प्रवीण भट्ट (उज्जैन), सोहनलाल कोलरिया, नंदकिशोर शर्मा, राजेश तिवारी, संतोष पांडे, रवि ओझा, रवि कोलरिया, नटवर झंवर, लक्ष्मीकांत खंडेलवाल, पं. योगेश जोशी, पं. बद्रीलाल व्यास, कमल पांडे, प्रमोद चांडक, सीतादेवी कोलरिया, सीमा आनंद व्यास, भेरडे दांपत्य, कन्हैयालाल गोयल, जुगल लढा, संजय गुप्ता अयोध्यावासी, कमल पांडे, राधेश्याम कोलरिया यांच्यासह महिला भाविक उपस्थित होत्या. सिकवाल समाजाच्या वतीने उपस्थितांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. दर महिन्याला येणार्‍या संकष्टी चतुर्थीला महाआरती करण्याचा निर्णय सिकवाल पंचायत अंतर्गत समितीने घेतला आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भाविकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले. पुढील काळातही मंदिरातील धार्मिक उपक्रमात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील भाविकांना एकत्र येऊन गणरायाची आराधना करण्याची संधी मिळाली.

Back to top button