वरु फार्मा एजन्सीचे संचालक पवन लढ्ढा यांच्यावर प्राणघातक हल्ला

हमालपुरा परिसरातील घटना

अमरावती /26 सप्टेंबर : वरु फार्मा एजन्सीचे संचालक पवन लढ्ढा यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केला. ही थरारक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यामुळे हमालपुरा परिसरातील नागरिंकामध्ये भितीचे वातावरण पसरले. घटनेनंतर लढ्ढा यांना गंभीर अवस्थेत तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात मारेकर्‍यांनी लढ्ढा यांच्यावर चाकुने स्पष्टपणे वार केले असल्याने रक्तबंबाळ अवस्थेत रिम्सच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. फरार मारेकर्‍यांचा पोलिस कसून शोध घेत आहे. पवन लढ्ढा हे स्थानिक व्यापारी समुदायातील एक सक्रिय आणि सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. या हल्ल्यामुळे व्यापारी जगतात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button