आज विश्वशांती रॅली व बुद्ध महोत्सवाची पहिली बैठक

भीम चौकात सुनील रामटेके यांचे नियोजित बैठकीचे आयोजन

* 21 वर्षांपासून अविरत कार्य सुरु; विश्वशांती रॅलीचे 22 वे वर्ष

अमरावती /22 मार्च : क्रांतीचा सूर्य आणि शांततेचा संदेश देणार्‍या महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी अमरावती नगरी सज्ज होत असून, या भव्य नियोजनाची पहिली पाऊलवाट सोमवार, 23 मार्च रोजी पडणार आहे. बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवार, 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील 21 वर्षांपासून अविरत सुरू असलेला हा वैचारिक वारसा यंदा 22 व्या वर्षात पदार्पण करत असून, या निमित्ताने शहरात विश्वशांती रॅली आणि बुद्ध महोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
या बैठकीत प्रामुख्याने 25 मार्चची सम्राट अशोक जयंती, 11 एप्रिलची क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि 14 एप्रिल रोजी येणारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे, भीम टेकडी येथील नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम आणि महानगर पालिके तील संविधानाच्या प्रास्ताविकेबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय या सभेत होणार आहे. 1 मे 2026 रोजी तथागत गौतम बुद्ध यांची 2569 वी जयंती ’बुद्ध महोत्सव’ म्हणून साजरी करण्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटना, कर्मचारी, विद्यार्थी आणि महिला मंडळांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्य संयोजक सुनील रामटेके यांनी या बैठकीला उपस्थित राहून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button