भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कारच्या

अमरावती पांढुर्णा महामार्गावरील खडका फाट्या नजीक घटना
वरुड/28एप्रिल– लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघालेल्या परिवाराच्या वाहणाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तीन वर्षीय चिमुकली सह आई व आजोबा
अशा तिघांचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास अमरावती पांढुर्णा महामार्गावरील खडका फाट्या नजीक घडली. समाधान किसनराव नान्ने (62), किरण गोपाल नान्ने (28), दिया गोपाल नान्ने (3), सर्व रा.विनायक नगर, खैरी, उप्पलवाडी जि.नागपूर असे मृतकांची नावे असून गोपाल समाधान नान्ने (38) हे गंभीर जखमी झाला आहे. नान्ने परिवार हा वॅगनार क्र.एम.एच.40 के.आर.0721 या क्रमांकाच्या वाहनाने अकोला जिल्ह्यातील अळसुड फाटा येथे लग्न समारंभात सहभागी होण्याकरीता जात असतांनाअमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील खडका फाट्यानजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर वाहन आदळुन अपघात झाला. अपघात होताच रस्त्याने ये जा करणार्या नागरिकांनी याची माहिती बेनोडा (शहीद) पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहीका चालक प्रफुल जिचकार व रुग्णसेवक अभिषेक जाधव यांनी जखमी व मृतकांना तातडीने वरुड ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. जखमी गोपाल नान्ने याचेवर प्राथमिक उपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशनचे हे.कॉ.निलेश डफडे, पो.कॉ.जयश्री चव्हाण करीत आहे.




