ज्ञानेश कुमारांना भारत रत्न द्या…!
सीजेपीच्या तिरंगा यात्रेत अभिजित दीपकेविरोधातच घोषणाबाजी

मोदी-मोदी’ घोषणांनी परिसर दणाणला
नवी दिल्ली/16ऑक्टोबर ; कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कवर ’तिरंगा यात्रे’साठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. संध्याकाळ होताच आंदोलक जमा व्हायला सुरुवात झाली. दरम्यान, एक क्षण असा आला की सीजेपी आणि अभिजीत दीपके विरोधाच घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी पालिका बाजाराच्या मेट्रो गेटसमोर जमलेल्या लोकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ’भारत रत्न’ देण्याची मागणीही केली.
यावेळी, निदर्शने करणार्या नागरिकांनी आणि पालिका बाजारातील दुकानदारांनी ’मोदी-मोदी’ आणि ’ज्ञानेश कुमार जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यासंदर्भात बोलताना एका निदर्शकाने सांगितले की, आम्ही भारतीय आहोत. कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडले गेलेलो नाहीत. ज्ञानेश कुमार यांना ’भारत रत्न’ने सन्मानित करण्यात यावे, ही आमची मागणी आहे. आम्ही कधीही सत्याची साथ सोडणार नाही. या व्यापार्यांनी आणि नागरिकांनी सीजेपीविरोधात जोरदार निदर्शने केली.





