डफरीन, सुपर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही लावणार

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची माहिती

अग्निशामक सुरक्षा अधिकार्‍याची नेमणूक करणार

सुव्यवस्थेसाठी पोलिस चौकी उभारणार

अमरावती/16 ऑक्टोबर : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा स्त्री रूग्णालय, सुपर स्पेशालिटी रूग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. या परिसरात उपद्रवी नागरिकांचा वावर कमी व्हावा, तसेच याठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राखली जावी, यासाठी हा परिसरात सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हा स्त्री रूग्णालयातील सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी येरेकर यांनी रूग्णालयाचे व्यवस्थापन, आरोग्य सेवा, अग्निशामक सुरक्षा आणि विविध विकासकामांबाबत आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वपूर्ण असलेल्या या रूग्णालयात सुविधा असणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार दर महिन्याला याबाबत आढावा घेण्यात येईल. रूग्णालयाच्या परिसरात सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यात यावी. परिसरात अनावश्यक येणारे लोक आणि उपद्रवी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी याठिकाणी तातडीने पोलिस चौकी उभारण्यात येईल.
जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीनंतर याठिकाणी एसएनआयसीयू सुविधेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हा एसएनआयसीयू नवजात बाळांच्या दृष्टीने महत्वाचा असून सर्व पडताळणी करून तातडीने कार्यान्वित करावा. ऑक्सिजन आणि कॉम्प्रेसरची सुविधा सुरू राहण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी व्यवस्था करावी. सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिल आणि अग्निशामक यंत्रणेचे ऑडिट करण्यात यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विद्यार्थी सुविधा व हॉस्टेल तातडीने करण्यात यावी. महाविद्यालयातील हॉस्टेल, लॅब, वातानुकुलीत कामाना लवकरात लवकर मंजुरी घेऊन ती पूर्ण करण्यात यावे. तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, व्होल्टेज फ्लक्चुएशन रोखणे, वृक्ष छाटणी आणि स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात यावे, निर्देश जिल्हाधिकारी येरेकर यांनी दिले.

Back to top button