सुप्रीम कोर्टाचा अनादर करण्याचा हेतू नाही
संजय राऊतांनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची माफी

मुंबई /16 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधात काही विधाने केली होती. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून त्यांच्या वर्तवणूकीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खासदार संजय राऊतांना स्पष्टीकरण मागितले आहे. यावरून खासदार राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची जाहीर माफी मागितली आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही न्यायालयाचा अवमान केलेला नाही. रागाच्या भरात एखादा शब्द इकडे-तिकडे गेला असेल. पण, न्यायालयाचा अवमान करण्याचा माझा कधीही हेतू नव्हता. या रागातून माझ्या तोंडून एखादा शब्द निघाला असेल, तर मी माफी मागतो. एकदा नव्हे तर दहावेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो, अशाशब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.आम्हाला आणि देशाला न्याय हवा आहे. डखठ च्या नावाखाली देशातील 13 कोटी जनतेचे नाव मतदार यादीतून वगळले गेले त्यांना न्याय हवा आहे. ज्याप्रकारे आमचा पक्ष फोडला, आमचे चिन्ह दुसर्याला दिले गेले. त्याबद्दल 4 वर्षापासून आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. त्यामुळे आम्हालाही न्याय हवा. त्यामुळे आमच्या मनात चीड येते. या रागात जर आमच्या तोंडून काही चुकीचे गेले असेल तर नक्कीच मी न्यायालयाची माफी मागेन. पण, या देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे. आम्ही अखेरपर्यंत न्यायासाठी न्यायालयासमोर विनवणी करत राहू, असेही खासदार राऊत पुढे म्हणाले.





