डिग्रीसोबत मिळवा किमान कौशल्य विकासाची जोड
आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

* क्लिनिकल रिसर्च असोसिएटच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे
अमरावती/3 एप्रिल: किमान कौशल्य कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत रेडियंट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे औपचारिक उद्घाटन आ. संजय खोडके यांच्या हस्ते दि. 3 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीच्या आ.सुलभाताई खोडके तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती च्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर , कौशल्य विकास अधिकारी अभिषेक ठाकरे, रेडियंट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद काकाणी, डॉ. पवन अग्रवाल, डॉ. माधुरी अग्रवाल, डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. अनुराधा काकाणी, प्रशासकीय अधिकारी सारंग लकडे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
किमान कौशल्य विकास कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजय खोडके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. ग्रामीण भागातील युवकांना अशा आधुनिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अध्यक्षीय भाषणात आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी युवकांना सांगितले की नुसती डिग्री घेऊन होणार नाही तर त्यासोबत कौशल्य असणे खूप गरजेचे आहे त्यामुळेच तुम्हाला रोजगार मिळण्यास सहाय्य होणार आहे. तसेच या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून ते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनतील. तसेच, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल कुकळकर यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन डॉ. पवन अग्रवाल यांनी केले. केंद्रात सध्या बाजारपेठेत मोठी मागणी असलेले लाइफ सायन्स या सेक्टरमधील क्लिनिकल रिसर्च असोसिएट हा प्रमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी, आशिष येरेकर, (भा. प्र.से). यांच्या विशेष मार्गदर्शना अंतर्गत सुरू झालेल्या या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क किंवा अनामत रक्कम घेतली जाणार नाही. रेडियंट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद काकाणी, डॉ. पवन अग्रवाल, डॉ. माधुरी अग्रवाल, डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. अनुराधा काकाणी, प्रशासकीय अधिकारी सारंग लकडे, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




