महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी
समता सप्ताह निमित्त आयोजित ‘समता दौड’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्र-कुलगुरू डॉ.महेंद्र ढोरे यांचे प्रतिपादन
अमरावती/9एप्रिल-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने समता सप्ताहनिमित्ताने आयोजित समता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाचे अधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचा-यांसह विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठएा प्रमाणात सहभाग घेतला.
सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पुतळा, पंचवटी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान ही ‘समता दौड’ काढण्यात आली. समता दौडचे हिरवी झेंडी दाखवून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एच.आर. देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, डॉ. तनुजा राऊत, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत, प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही.जी. ठाकरे, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, डॉ. पंजाबराव देशमुख नियमन केंद्र समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, डॉ. गजानन मुळे, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे तसेच विविध प्राधिकारिणींचे आजी व माजी सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पंचवटी चौक येथून निघालेल्या समता दौडने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे व त्यानंतर कला व वाणिज्य महाविद्यालय येथे सुध्दा महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. इर्विन चौक येथे या समता दौडचे समापन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करतांना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी देशाच्या उभारणीमध्ये फार मोठे योगदान दिले असून त्यांच्या विचाराची सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि मार्गक्रमण करावे. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठा संख्येने उपस्थित होते.




