अ‍ॅड. प्रीती रेवणे यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा

अमरावती /9 एप्रिल: नवनियुक्त शिक्षण सभापती अ‍ॅड. प्रीती हर्षल रेवणे यांनी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत शिक्षण विभाग महानगरपालिका अमरावती अंतर्गत येणार्‍या सर्व कार्यालयीन कर्मचार्‍यांची आढावा सभा घेण्यात आली सर्वप्रथम नवनियुक्त शिक्षण सभापती अ‍ॅड. प्रीती हर्षल रेवणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नंतर सदर सभेमध्ये सर्व कर्मचार्‍यांचा परिचय व त्यांच्याकडे असलेल्या विषया संदर्भात माहिती जाणून घेण्यात आली सोबतच विभागांतर्गत सुरू असलेल्या सर्व विषय व माहितीचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षण सभापती म्हणून काम करीत असताना आपल्या विभागाअंतर्गत एक कामाचा रोडमॅप तयार असायला हवा,त्यासोबतच निश्चित उद्दिष्ट व त्यावरील प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे, शाळांच्या भौतिक सुविधा सोबतच शाळांचा गुणात्मक विकास कसा होईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले, यासाठी शाळानिहाय आवश्यकता व त्यासाठीची पूर्तता याबाबतचे नियोजन करून छोटे छोटे उद्दिष्ट आधी आपण साध्य करूया असा मानस त्यांनी व्यक्त केला. सर्व मुख्याध्यापकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्यात .मनपाच्या नवीन शाळा बांधण्या संदर्भात जे प्रस्ताव आहेत त्या शाळांचे डिझाईन आर्किटेक टीमने समजावून सांगितले व प्रस्तावित शाळांचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सभापती यांनी आदेश दिले.

संबंधित बातम्या

Back to top button