थकित मालमत्ता करामुळे विलासनगरातील दुकानावर जप्ती

महानगरपालिकेची सीलिंग कारवाई

अमरावती /25 मार्च : महानगरपालिकेच्या झोन क्र. 1 अंतर्गत रामपुरी कॅम्प प्रभागात थकित मालमत्ता कर वसुलीसाठी आज बुधवारी (दि. 25 मार्च 2026) कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या आदेशानुसार, वार्ड क्र. 13 मधील मालमत्ता क्रमांक 1680 ही थकबाकीदार असल्याने विलासनगर परिसरातील संबंधित दुकानावर जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित मालमत्तेला सील करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या मोहिमेद्वारे थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरावा, असे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button