संत सदगुरू सदराम महाराज समाधी सोहळा संपन्न
श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे

कुर्हा /30 जून: श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान,श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे संत सदगुरू सदाराम महाराज समाधी सोहळा संपन्न झाला प्रथम सकाळी श्री विठ्ठल रुख्मिणी यांचा अभिषेक व नंतर संत सदगुरू सदाराम महाराज यांच्या परंपरे नुसार समाधीचा अभिषेक व पूजा सचिव श्री सदानंद साधु कुटुंबीय व विश्वस्त अतुल ठाकरे यांचे हस्ते करण्यात आली. सकाळी संत सदगुरू सदाराम महाराज यांच्या पोथीचे पारायण करण्यात आले.या प्रसंगी भजन व काला झाला.याप्रसंगी श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान मध्ये सतत सेवा देणारे वारकरी भजनी मंडळातील सर्वांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला .ह्या कार्यक्रमाला संस्थांनचे अध्यक्ष श्री नामदेवराव अमांळकर , उपाध्यक्ष वसंतराव डाहे , विश्वस्त श्री हिम्मतराव टाकोणे, अशोकराव पवार ,व्यवस्थापक कपिल गावंडे व कुटुंबीय तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. विश्वस्त अतुल ठाकरे कुटुंबीय यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.




