प्रा.कुणाल झोटींग यांना भूगोल विषयात पीएच.डी.

अमरावती /5एप्रिल: दारापूर येथील रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. कुणाल अनिलराव झोटींग यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून भूगोल विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. झोटींग यांनी पश्चिम विदर्भाच्या अडाण नदी खोर्यातील आठवडी बाजार केंद्रांच्या जाळ्यांचे भौगोलिक अध्ययन या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यांनी हे संशोधन कार्य कला व विज्ञान महाविद्यालय, कुर्हा येथील भूगोल संशोधन केंद्रामार्फत पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाला शेंदुरजनाघाट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. तिलकचंद जी. धोटे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. झोटींग यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे. त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. तिलकचंद धोटे, प्रा. डॉ. सुनिल आखरे, प्रा. डॉ. नितीन मुंढे, प्रा. डॉ. गेडाम, प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे, प्रा. डॉ. विजय टोम्पे, प्रा. डॉ. अभिजीत दोड, प्राचार्य डॉ. अभ्यंकर, प्रा. डॉ. किशोर ताकसांडे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्या या यशाबद्दल वडील श्री. अनिलराव झोटींग, आई सौ. अलका झोटींग, पत्नी सौ. मोनाली झोटींग, मुलगा राजवीर झोटींग यांसह कुटुंबीय व मित्रपरिवाराने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




