हर हर महादेवच्या गजरात भगवान भोलेनाथ चरणी बिल्वपत्र अर्पण
आ.सुलभा खोडकेंनी घेतले शिव-शक्तीचे कृपाशीर्वाद

* हर हर महादेव तसेच ओम नमः शिवायच्या अखंडित नामजपात महाशिवरात्री पर्व उत्साहात
अमरावती /15 फेब्रुवारी : महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही, तर तो आत्मचिंतनाचा, जागृतीचा आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याचा पावन क्षण आहे. वर्षातून येणारी ही अंधारातील रात्र मनाला प्रकाशाकडे नेणारी आहे. ज्या रात्री संपूर्ण सृष्टी ध्यानमग्न होते, त्या रात्री भोळ्या भावीकांच्या हृदयात शिवचैतन्य जागृत होते.
शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे शांती आणि शिव म्हणजे सत्य अशा या भगवान श्री महादेवांचा महिमा शब्दात मानणे कठीण असले, तरी भावनेतून अनुभवता येतो.भगवान महादेवांच्या उपासनेमध्ये मनातील, आत्म्यातील अशुद्धी दूर करण्याचे सामर्थ्य आहे.आपल्या भौतिक पातळीवर शिव – पार्वती म्हणजे शिव – शक्ती या देवस्वरूप व्यक्तीरेखा त्यांच्या उपासना, पूजन, ध्यान यांच्या द्वारा संतुलन साधणे ही महाशिवरात्रीची साधना होय. शिव – शक्तीची संकल्पना नीट समजून घेतली तर होणार्या आनंदातून वेगळी अनुभूती येऊ शकते.असे प्रतिपादन आमदार – सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावतीमध्ये महाशिवरात्री निमित्त प्रत्येक शिवालयात विविध धार्मिक- आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान आमदार- सौ. सुलभाताई खोडके, आमदार- संजय खोडके यांनी अमरावती महानगर स्थित शिव मंदिर- अंबागेट, गडगडेश्वर महादेव मंदिर, आसरा माता विठ्ठल मंदिर -यशोदा नगर क्रमांक – 2,विद्या निकेतन कॉलनी-अर्जुन नगर – एसएसडी बंगला परिसर स्थित भोलेनाथ मंदिर,श्री सोमेश्वर संस्थान परिसर देव पार्क पनपालिया ले – आऊट- शेगाव- रहाटगाव रोड, , ओम कॉलनी, श्री शिव मंदिर – विश्वेश्वर अध्यात्मपीठ श्री क्षेत्र रेवसा, शिवसाई मंदिर – यशोमंगल कॉलनी, श्री महादेव मंदिर हरीओम नगर,श्री शंकर मंदिर – रहाटगाव आदी ठिकाणी आयोजित कार्यक्रम स्थळी भेट देऊन भगवान शिव व शक्तीस्वरूपा माता पार्वतीदेवीचे दर्शन घेत कृपाशीर्वाद घेतले. यादरम्यान भगवान शिवशंकर – माता पार्वती यांच्या प्रतिमेस नमन – वंदन – पूजन व माल्यार्पण करीत आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांनी भावीकभक्तांचे मनोरथ पूर्ण होण्याची भगवान भोलेनाथ चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची रात्र महाशिवरात्री… व्रत आणि जागरण ’ शिवतत्व ’ ओळखण्याची संधी असा पौराणिक कथेतील उल्लेख करीत महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व पौराणिक कथांव्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि रात्रीला इतके महत्व दिले जाते. महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे. ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे, जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे. एकीकडे भगवान शिव संहारक म्हणून ओळखले जातात. तर दुसरीकडे ते सर्वात कृपाळू म्हणून ओळखले जातात. आ.संजय खोडके आदी सहित अंबागेट, यशोदा नगर क्रमांक – 2,गडगडेश्वर, विद्या निकेतन कॉलनी, पनपालिया ले-आऊट, रहाटगाव, ओम कॉलनी, यशोमंगल कॉलनी, हरिओम नगर, रेवसा येथील भाविकभक्त तसेच महाशिवरात्री महोत्सव 2026 आयोजन समितीचे सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.




