आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम
महानगरपालिकेच्या सर्व शहरी आरोग्य केंद्राचे गुणवत्ता व

अमरावती /15 फेब्रुवारी – अमरावती महानगर पालिकेअंतर्गत 13 शहरी आरोग्य केंद्र असून ह्या आरोग्य केंद्रांतर्गत 29 आरोग्य वर्धनी केंद्र आहेत अमरावती महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना उच्चतम आरोग्य मिळाले पाहिजे त्या करिता आयुक्त सौम्या शर्मा चांडक , अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक , उपायुक्त योगेश पिठे , डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य केंद्र हे सुसज्जित असले पाहिजे , लसीकरण झाले पाहिजे ,गर्भवती महिलाना तपासणी व उपचार मिळाले पाहिजे,प्राथमिक केंद्र कसे असायला पाहिजे, आरोग्य केंद्र उपचार व्यतिरिक्त त्यांना देण्यात येणार्या सुखसोयी पिण्याचे पाणी, वेटींग रूम , बाह्यरुग्ण कक्ष ,महिलाना तपासणी करिता महिला डॉक्टर , रुग्णालयात सर्व प्रकारचे माहिती पत्रक लावणे गरजेचे आहे हा संकल्प घेऊन शहरी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे त्या आरोग्य केंद्र चे गुणवत्ता व कायाकल्प कार्यक्रम अंतर्गत मूल्यमापन करिता अकोला चे डॉ विनोद करंजीकर जिल्हा आर सी एच अधिकारी अकोला , डॉ मनीष शर्मा जिल्हा क्षय रोग अधिकारी अकोला यांच्या दौरा झाला त्या दौर्यात अमरावती मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आर सी एच अधिकारी डॉ स्वाती कोवे , डॉ वंदना गुढे शहर गुणवत्ता आश्वासन अधिकारी , डॉ रुपेश खडसे साथ रोग अधिकारी , सारिका पाटील यांच्या समिती ने 13 आरोग्य केंद्र ज्या मधे हैदरपुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ सीमा नैताम ,भाजीबाजार येथील डॉ फिरोज खान वैद्यकीय अधिकारी तथा क्षय रोग अधिकारी, आयसोलेशनचे डॉ.अश्विनी खडसे ,पठाण चौक चे निगार खान, मसाणगंजचे डॉ.अल्मास खान , महेंद्र कॉलनी चे डॉ.अकिब खान ,विलासनगर चे डॉ मनीष ठाकरे , संजीवनीचे डॉ वैशाली कावरे,हमालपुराचे डॉ मानसी मुरके बडनेराचे डॉ इम्रान शाह , जिल्हा सामान्यचे डॉ पौर्णिमा उघडे ,दस्तूरनगरचे डॉ विक्रांत राजुरकर व वडाळी अशा सर्व शहरी आरोग्य केंद्राची प्राथमिक गुणवत्ता व कायाकल्प कार्यक्रम चे समिती अतंर्गत तपासणी केली असता सर्वच ठिकाणी येणार्या रुग्णांना उपचारासोबतच त्यांना आरोग्य केंद्राची माहिती , उपचार असे होतात , डॉक्टर कोणकोणते आहेत.आरोग्य केंद्र सुसज्जित राहावे म्हणून आरोग्य निरीक्षक हैदर अली , शशिकांत जैस्वाल , दिवाकर बरडे ,शशांक निवाणे , बबन खंडारे , शरद सावळे ,अतिश यादव ,मीनाक्षी पाटेकर ,अर्चना बायस्कर,वैशाली सुरोशे ,सीमा तेलंग , बबिता तायडे ,राधिका झाडे ,अंजू कासदेकर खालेलकर, फारुख गौरी यांनी सहकार्य करून मूल्यमापन दौरा यशस्वी केला व समिती ने सर्व वैद्यकीय अधिकार्यांना शुभेच्या दिल्या व राज्यात अमरावती एक नंबर वर येईल अशा आश्वासन देण्यात आले.




