पाच दिवसांच्या बँकिंगसाठी कर्मचारी आक्रमक

प्रलंबित निर्णयामुळे अमरावतीत संतापाचा भडका

मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

अमरावती /13 ऑगस्ट – बँक अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याची मागणी प्रलंबित ठेवल्याने बुधवारी सायंकाळी शहरातील विविध बँकांच्या कर्मचार्‍यांनी जोरदार निदर्शने केली. शनिवार व रविवार साप्ताहिक सुट्टी देऊन पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. वाढते कामाचे ओझे आणि सतत उपलब्ध राहण्याची जबाबदारी यामुळे कर्मचार्‍यांमध्ये ताण वाढत असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बँक कर्मचारी संघटनांच्या आवाहनानुसार अमरावतीसह राज्यातील विविध ठिकाणी अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजानंतर निदर्शनात सहभागी झाले. अमरावतीतील स्थानिक इर्विन चौकात सायंकाळी 6 वाजता मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र आले. संगणकीय बँक व्यवहार वाढल्याने सेवा दिवसरात्र उपलब्ध ठेवावी लागते. त्यातच कामाचा वाढता व्याप आणि जबाबदार्‍या यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. 27 जानेवारी 2026 रोजी झालेल्या संपानंतर या मागणीवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा होती. भारतीय बँक संघटनेसोबत झालेल्या करारातही या मागणीचा उल्लेख असूनही अंतिम निर्णय होत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी वाढली आहे. पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू झाल्यास कर्मचार्‍यांना नियमित विश्रांती मिळून कामाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल असा दावा संघटनांनी केला.दरम्यान अमरावतीतील सफाई कर्मचार्‍यांच्या संघटनेच्या निधीत 88 लाख 11 हजार 991 रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणात एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून पाच आरोपींना 11 ऑगस्ट रोजी दुपारी अटक करण्यात आली. बाबूलाल गोहर वय 61 वर्षे आनंद डागोर वय 48 वर्षे संदीप सिरसिया वय 38 वर्षे लखन जाधव वय 51 वर्षे आणि यशोदानगर येथील संतोष चावरा वय 43 वर्षे यांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश आहे. संबंधित आर्थिक गैरव्यवहार 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत रेल्वे स्थानक चौकाजवळील गुलशन टॉवर येथील संघटनेच्या कार्यालयात झाल्याचा आरोप आहे. संघटनेच्या निधीच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला. पदाधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर करून संघटनेच्या निधीतील मोठी रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. तत्कालीन सचिव अध्यक्ष संचालक दोन महिला पदाधिकारी लेखापरीक्षक आणि सनदी लेखापाल यांच्यासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल कडू यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. यातील एका आरोपीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button