ज्ञानमाताचा स्वराज चौधरी दहावीत झळाळला गुणवत्ता यादीत

अमरावती/11 मे: नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात ज्ञानमाता इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी चि. स्वराज सुशील चौधरी याने 95% गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. केवळ अभ्यासातच नव्हे, तर गायन आणि क्रीडा क्षेत्रातही स्वराजने आपली विशेष रुची जपली असून त्याच्या या अष्टपैलू यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वराजला शैक्षणिक वारसा लाभला त्याचे वडील सुशील चौधरी हे गांधी विद्यालय, बडनेरा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा ’शौर्य पुरस्कार’ मिळाला आहे. त्याची आई श्रीमती पूनम चौधरी या गणेशदास राठी विद्यालयात संस्कृत शिक्षिका आहेत.विशेष म्हणजे, स्वराजच्या घरात यशाची परंपरा आधीपासूनच आहे. त्याची मोठी बहीण कु. संपदा सुशील चौधरी हिनेदेखील दहावीमध्ये संपूर्ण विदर्भातून द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला होता. ती सध्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे. स्वराजने आपल्या या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक आरोकिय सामी, उपमुख्याध्यापिका डॉ. बेनिता रँफेल, वर्गशिक्षक अभयचंद्र येवतीकर सर आणि आपले काका उपायुक्त हर्षद चौधरी यांना दिले आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाकडून मिळालेले शैक्षणिक वातावरण यामुळेच हे यश शक्य झाल्याचे स्वराजने आवर्जून नमूद केले.स्वराजने अभ्यासासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या या यशामुळे चौधरी कुटुंबावर आणि ज्ञानमाता शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button