अमरावतीची वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवा
पोलीस आयुक्तांना निवेदन सादर

अमरावती/11 मे: शहराच्या चौकाचौकात साचलेला वाहनांचा ढिगारा आणि पादचार्यांची होणारी प्रचंड ओढाताण थांबवण्यासाठी आता अमरावतीचे लोकप्रतिनिधी थेट मैदानात उतरले आहेत. शहरातील मुख्य रस्ते आणि शाळांच्या परिसरात रोजच होणार्या वाहतुकीच्या जाचातून सुटका करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे सुधारणेचे साकडे घालण्यात आले. अवैध वाहने आणि नियम मोडणार्या चालकांमुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्कील झाल्याचा पाढा यावेळी वाचण्यात आला.
शहरात राजकमल येथील रिक्षा चालकांचा मनमानी कारभार, इरविन चौकातील गर्दी आणि राजापेठ बस स्थानकावरील गोंधळ यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. चित्रा चौक, चौधरी चौक आणि बडनेरा मार्गावरील गोपाल नगर चौकात तर पायी चालणेही धोक्याचे झाले आहे. हीच ओरड घेऊन उपमहापौर सचिन भेंडे आणि गटनेते नाना आमले यांच्या नेतृत्वात मोठा ताफा आयुक्तांच्या भेटीला पोहोचला. शाळा सुटण्याच्या वेळी होणारी जीवघेणी कोंडी आणि अपुर्या पोलिसांमुळे निर्माण होणारा गोंधळ तातडीने थांबवण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. या मोहिमेत शिक्षण सभापती अॅड. प्रिती हर्षल रेवणे, नगरसेवक किशोर जाधव, श्रीमती सुमती ढोके, अजय मदनमोहन जयस्वाल आणि दिपक किसनलाल साहु यांनी आक्रमक भूमिका मांडली. सोबतच नगरसेविका नंदा धनंजय सावदे, रजनी राजेश डोंगरे, गौरी शैलेंद्र मेघवानी आणि महेश धनराज मुलचंदानी यांनीही सुरक्षेचा मुद्दा लावून धरला. या निवेदनावर योगेश रघुनाथ विजयकर, अर्चना अशोक पांडे, प्रियंका भूषण पाटणे, मिराताई कांबळे, मधुरा मिलिंद कहाळे यांच्यासह अवि काळे, श्रीकांत इंगळे, नितीन बोरेकर, मिलिंद कहाळे, शुभम उंबरकर, संदीप कांबळे आणि शैलेंद्र मेघवानी यांच्या स्वाक्षर्या असून प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलण्याची तंबी लोकप्रतिनिधींनी दिली आहे.




