खरुले कुटुंबीयांचे नवनीत राणांनी केले सांत्वन
शासकीय आर्थिक आर्थिक मदत मिळवून देणार

शेतकरी आत्महत्येनंतर शेंदोळा धसकट गाव शोकमग्न
अमरावती/30 ऑक्टोबर – तिवसा तालुक्यातील शेंदोळा धसकट येथील शेतकरी अशोक खरुले यांनी 26 ऑक्टोबर रोजी टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी खा. नवनीत राणा यांनी तातडीने खरुले यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी थेट संपर्क साधून पीडित कुटुंबाला शासकीय नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली पहिली जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी खरुले कुटुंबीयांना बळ मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, धीरज केने, ज्योतीताई यावलीकर, गायत्रीताई देशमुख, युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनालीताई नवले, दयाभाऊ राठोड, अमरभाऊ पाचघरे, प्रवीणभाऊ लसणापुरे, बंडूभाऊ लसणापुरे, श्रीकृष्णभाऊ अरमळ, सौरभभाऊ कोहळे उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.





