इंडिया आघाडीचा आज ‘जनभियोग’ कार्यक्रम

राहुल गांधी यांची माहिती

नवी दिल्ली/30 ऑक्टोबर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज (30 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आलेला ‘जनभियोग’ कार्यक्रम दिल्लीतील हवामानातील परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलल्यानंतर, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, ‘जनभियोग’ आज शनिवारी (31 ऑक्टोबर) त्याचवेळी आयोजित केला जाईल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संपूर्ण विरोधक एकवटलेले आहेत आणि विविध ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही प्रत्यक्षात एकच आणि एकत्रित आंदोलनाचा भाग आहेत. परंतु, लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप करत राहुल गांधी यांनी सांगितले की, कार्यक्रम रद्द झालेला नाही, तर केवळ एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. जनभियोगाचा कार्यक्रम उद्या त्याचवेळी होईल आणि विरोधक माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच विविध पक्ष आणि संघटनांकडून केली जाणारी आंदोलने ही वेगळी मानली जाऊ नयेत, कारण आमच्या सर्वांचे उद्दिष्ट एकच आहे, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनीही विरोधी पक्षांच्या एकजुटीवर भर दिला. त्यांनी खात्री दिली की, ‘इंडिया’ (खछऊख-) आघाडी या लढ्यात एकत्र उभी आहे आणि विरोधकांना नक्कीच विजय मिळेल. तर समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनीही भाजपवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, भाजपने अनेक जागा संशयास्पद मार्गांनी जिंकल्या आहेत. ज्या मतदारसंघांत त्यांना पराभव पत्करावा लागला, तिथे पराभवाचे अंतर खूप मोठे होते. त्यांनी पुष्टी केली की, आज नियोजित असलेला कार्यक्रम आता उद्या होईल आणि त्यात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही सहभागी होणार आहेत. दरम्यान, विरोधी नेत्यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, कार्यक्रम पुढे ढकलला गेला असला तरी, विरोधी आघाडीच्या रणनीतीत कोणताही बदल झालेला नाही.

Back to top button