‘लँडस्केप आर्किटेक्चर’ विषयावर मार्गदर्शन

पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे

अमरावती /20 मार्च : पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे ‘लँडस्केप आर्किटेक्चर’ या विषयावर एक सखोल व ज्ञानवर्धक संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून झख-ऊड कॉलेज नागपूर येथील प्रख्यात तज्ञ डॉ. सारंग गुर्जर यांनी संवाद साधला या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देशमूख अध्यक्ष म्हणून लाभले होते. लँडस्केप आर्किटेक्चरचे महाविद्यालयात नेहमी उत्कृष्ट रित्या आयोजीत करण्यात येते. श्ररपवीलरशि रीलहळींशर्लीीींश चे आधुनिक वास्तुकलेतील वाढते महत्त्व अधोरेखित केले. शहरांच्या वाढत्या नागरीकरणामुळे हरित क्षेत्रांचे जतन आणि नियोजन कसे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ इमारतींच्या रचनेपुरते मर्यादित न राहता, पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम विघे यांनी केली त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आर्किटेक्ट रेणुका यांनी आपल्या मनोगणात श्ररपवीलरशि आर्किटेक्चर म्हणजे काय तसेच अभ्यासक्रम, बांधकाम व निसर्ग यांचे उत्कृष्ट नियोजन, शहराच्या आराखड्याचे नियोजन, ऐतिहासिक महत्व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख वक्ते डॉ. सारंग गुर्जर यांनी अत्यंत सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी लँडस्केप आर्किटेक्चर म्हणजे काय, त्याची व्याप्ती, तसेच यामधील करिअरच्या संधी याबाबत माहिती दिली. त्यांनी शहरी नियोजन, उद्याने, सार्वजनिक स्थळे, जलसंधारण, जैवविविधता यांचा समतोल राखत डिझाइन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. आधुनिक काळात हवामान बदल, पर्यावरणीय र्‍हास यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी लँडस्केप आर्किटेक्चरची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी उदाहरणांसह प्रकाश टाकला. डॉ. गुर्जर यांनी विविध यशस्वी प्रकल्पांचे दाखले देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची झलक दिली. त्यांनी प्रकल्पाच्या उत्पन्ना मध्ये नक्कीच फरक पडतो याविषयीं मार्गदर्शन केले. तसेच कुठल्या प्रकारचे शुशोभीत झाडें लावावे याविषयी सांगितले. विविध आकाराचे व उंचीचे दगड वापरून पाण्याचा झरा तयार करण्याचे कौशल्य व त्यामधील पाण्याचा आदडणारा मधुर स्वर याचे महत्व सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button