म.न.पा.शाळा जेवडची स्टेच्यु ऑफ युनिटी येथील शैक्षणिक सहल यशस्वी

अमरावती/6 एप्रिल- म.न.पा. प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच स्टेच्यु ऑफ युनिटी व अहमदाबाद येथे शैक्षणिक सहल आयोजित केली होती. या सहलीमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहल दरम्यान विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेतले. येथे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच संग्रहालय, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स व आसपासच्या परिसराची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.यानंतर अहमदाबाद येथे विद्यार्थ्यांनी साबरमतीला आश्रमाला भेट दिली. येथे महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. याशिवाय शहरातील इतर ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांनाही भेट देण्यात आली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना इतिहास, संस्कृती व देशभक्तीची प्रेरणा मिळाली. सहलीचे आयोजन मा. सौ.सौम्या शर्मा चांडक आयुक्त,म.न.पा. अमरावती यांचे प्रेरणेतून व मा. डॉ. श्री.राजेंद्रजी तायडे ,गटनेता,मा.श्रीमती सुमतीताई ढोके, उपसभापती, शारदाताई खोंडे नगरसेविका , संजय गव्हाळे नगरसेवक म.न.पाअमरावती यांचे योगदानातून तसेच .नरेंद्र वानखडे उपायुक्त व डॉ.प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनात तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रशांत नालसे व शिक्षकवृंद श्रीमती शीला डांगे,सौ.सीमा शिरभाते, कु.किरण नालिंदे,कु.वैशाली बुटे, कु.हर्षा दिवे,कु.पुष्पा कोरडे, कु.सोनाली चापके,कु.किरण शेंडे,श्री.शिरीष फसाटे व पालक यांच्या सहकार्याने करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button