माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले मुळचे ब्राह्मण

त्यांचे आडनाव करंदीकर

* नितीन गडकरी यांचे खळबळजनक विधान

नागपूर /6 एप्रिल: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे मुळचे कोकणस्थ ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव करंदीकर’ होते, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी इराण आणि भारताचे संबंध किती जिव्हाळ्याचे होते यावरही प्रकाश टाकला.
मंत्री गडकरी म्हणाजे की, ‘अंतुले मुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी स्वतः मला सांगितले होते की, मी मुळचा ब्राह्मण असून माझे खरे आडनाव करंदीकर आहे.’ काही कर्मठ प्रवृत्तींमुळे त्यांच्या पूर्वजांना धर्माबाहेर काढण्यात आले, परिणामी त्यांचा धर्म बदलला. त्या काळात मांसाहार करणे किंवा परदेशात जाणे यांसारख्या कारणावरूनही समाजातून बहिष्कृत केले जात असे, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले. विरोधकांकडून केल्या जाणार्‍या आरोपांचा समाचार घेताना गडकरी म्हणाले की, “ हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक जीवनप्रवाह आहे. आपण सर्व या एकाच संस्कृतीने जोडले गेलो आहोत. भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही.संविधानातील ’सेक्युलर’ शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून ’सर्वधर्म समभाव’ असा आहे. भाजप याच विचारधारेवर चालतो. संविधान धोक्यात येईल किंवा मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाईल, ही भीती केवळ राजकीय हेतूने पसरवली जात असून ती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. खरेतर देश चालवणारा नेता हा कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी तो राज्यकारभारात धर्मनिरपेक्ष असावा, मात्र व्यक्ती म्हणून प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. सेक्युलर होते तर ब्राम्हणांना बोलावून इंदिरा व राजीव गांधी यांना मंत्राग्नी का दिला? राजीव गांधींनी पंतप्रधान असताना पूजाविधीसाठी ब्राह्मणांना बोलावले नसते, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

Back to top button