छत्री तलाव येथे साफ-सफाई अभियान
आ.रवि राणा व भाजपा नेत्या माजी खा.नवनीत रवि राणा यांनी केले श्रमदान

अमरावती /28 एप्रिल: आ.रवि राणा यांच्या जनसेवा दिवस म्हणून विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी छत्री तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवून या दिवसाची अर्थपूर्ण सुरुवात करण्यात आली. आमदार रवि राणा आणि भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत रवि राणा यांनी सकाळी 6.00 वाजल्यापासून स्वतः श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या स्वच्छता अभियानात तलाव परिसरातील साचलेला गाळ, गोटे, काचेचे तुकडे तसेच पाण्यात विसर्जित झालेल्या देव-देवतांच्या मूर्ती बाहेर काढून त्यांची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली. जनसेवा दिवस निमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून छत्री तलाव कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार रवि राणा यांनी सांगितले की, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये छत्री तलाव पर्यटनाला चालना मिळण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांच्याकडे 25 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात तलाव परिसराचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणे तसेच तलावामध्ये तरंगते रेस्टॉरंट सुरू करण्याचा प्रस्ताव समाविष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. जनतेच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामुळे जनसेवा दिवस खर्या अर्थाने साजरा झाला असून, पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सुनिल राणा, निळकंठराव कात्रे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, अजय गाडे, शिवदासजी घुले, सुखदेव तरडेजा, दादाराव महल्ले, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती अॅड. प्रिती बनारसे, माजी महापौर संजय नरवने, नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, किशोर जाधव, महेश मुलचंदानी, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, अर्चना पांडे, प्रियंका पाटने, योगेश विजयकर, स्विकृत नगरसेवक अँड.प्रशांत देशपाडे, स्विगृत नगरसेवक संजय हिंगासपुरे, नंदा सावदे, डॉ. मधुरा कहाळे, दीपक साहू सम्राट, किशोर पिवाल, नितीन बोरेकर, सोनाली नवले, अर्चना तालन, बाळु इंगाले, राजा बांगडे, उमेश ढोणे,किरण म.अंबाडकर, हर्षल रेवणे, संदिप कांबळे, तुषार दुधे, श्याम कथे, भुषण पाटने, सपना ठाकुर, इंजि.मिलींद कहाळे, अरुणा चचाणे, अशोक पांडे, बंडु डकरे, वंदना जामनेकर,शैलेश मेघवानी, शैलेश शिरभाते, सुचिता गोडे, अश्विनी झोड, अविनाश काळे, आशिष कावरे, राजु हरणे, श्रीकृष्ण बैलमारे, देवानंद राठोड, ओंकार माहोड, निरज गवई, नरेंद्र तलखेडे, संजय माहुलकर, संदिप कांबळे, मुस्ताकभाई, राजा बाखडे, स्वप्नील चाफले, रवि विरुळकर, देवा शेंडे,सुनिल तरडेजा, प्रशांत कावरे, अजय घुले, निता खडसे, अर्जुन दाते, यांच्यासह धडझ चे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




