फडणवीसांच्या खुर्चीसाठी ठाकरेंचं साईबाबांना साकडं

पंतप्रधानपदासाठी फडणवीसांना ठाकरेंचा पाठिंबा?

नवी दिल्ली/29 जून– तोच विमान प्रवास आहे ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचं वादळ उठवलं. शिवसेनेतील पडझड रोखण्यासाठी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन पुर्नबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दौरा केला खरा पण या यादौर्‍यात त्यांनी शिवसेनेऐवजी फडणवीसांच्या प्रमोशनसाठी मोर्चेबांधणी केल्याचं जास्त दिसलं.
कारण उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांचा तर समाचार घेतलाच परंतू याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची खुर्ची वाचावी यासाठी थेट साईबाबांना साकडं घातलं. आणि पंतप्रधानपदासाठी देवेंद्र फडणवीसांना उघड उघड पाठींबा देण्याचे संकेत दिले.मात्र अमित शाहांनी 2029 मधील पंतप्रधानपदासाठी प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडी सुरू असल्याचा दावा यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी केलाय. आणि त्यामुळेच हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचंही त्यांनी जाहीर सभांमधून सांगितलं. एवढंच नव्हे फडणवीसांना गुंतवून ठेवण्यासाठी अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना फडणवीसांची सुपारी दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिलीय. पुर्ण दौर्‍यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी मोर्चेबांधणी केली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्षावर त्यांनी अचूक नेम धरल्यानंतरही फडणवीसांनी या चर्चांना फुलस्टॉप देण्याऐवजी शुभेच्छा स्विकारत असल्याचं सूचक विधान केलं.

संबंधित बातम्या

Back to top button