शहरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सायकलची नवी गती

मनुभाई शाह परिवराच्यावतीने गरजू गुणवंतांना सायकलींचे मोफत वाटप

अमरावती /29 जून- यकली सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, सकल जैन समाजाचे प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, आर्थिक परिस्थिती बेताची असूनही जिद्दीने शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडथळे या सायकलमुळे दूर होणार आहेत. मनुभाई शाह यांनी आसर्वमंगल फॅमिली ट्रस्टच्या सहकार्याने आणि राष्ट्रसंत परम नम्रमुनी गुरुदेव यांच्या प्रेरणेतून अमरावतील 135 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची वाट सुलभ व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवास आता अधिक सोपा झाला आहे.अमेरिकेतील मनुभाई शाह आणि रिकाबेन शाह यांच्या आर्थिक सहकार्यातून देशपातळीवर राबविल्या जाणार्‍या सायकल अर्पण उत्सवांतर्गत अमरावतीत हा कार्यक्रम पार पडला. धर्मदाय कॉटन फंड परिसरात आयोजित या सोहळ्यात अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सापल्या 82 व्या वाढदिवसानिमित्त 82 हजार सायकलींचे वाटप करून माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्रसंत परम नम्रमुनी गुरुदेव यांनी संदेश दिला की, सायकल आपल्याला जीवनात नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा देते, जसा सायकलचा पॅडल मारला की ती पुढे जाते, तसाच पुरुषार्थ केल्यास आयुष्यात प्रगती नक्कीच होते. अमेरिकेवरून ऑनलाइन संवाद साधताना मनुभाई शाह यांनी सांगितले की, सायकलमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि ते नियमितपणे शाळेत पोहचू शकतील. अर्हम युवक सेवा ग्रुपने गेल्या 18 वर्षांपासून सुरू ठेवलेल्या या मानवसेवेच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संस्थेमार्फत दररोज देशभरात लाखो मुलांना भोजन दिले जाते, तसेच गरजूंना ऑटो रिक्षा, कपाटे, ग्रामीण शाळांचे आधुनिकीकरण आणि अर्हम एनिमल अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे पशुसेवा अशा विविध प्रकल्पामधून समाजकार्य अखंड सुरू आहे. सध्या नऊ राज्यांत 40 अर्हम एनिमल अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत असून, नुकतीच रायपूर येथे 41 वी रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button