मला नियम शिकवू नका! मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली /6 ऑगस्ट ;  सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकार आणि विरोधी पक्षांमधील वाद अद्यापही संपताना दिसत नाही. यातच, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात गुरुवारी राज्यसभेत संसदेच्या नियमांवरून जबरदस्त खडाजंगी बघायला मिळाली.
किरेन रिजिजू यांच्या एका वक्तव्यावर खर्गे अतिशय आक्रमक झाले. ते म्हणाले, आता मला रिजिजूंकडून नियम शिकावे लागतील का? मलाही संसदेचे नियम माहीत आहेत. मी सभागृहात काय बोलावे, कधी बोलावे आणि कसे बोलावे, हा माझा अधिकार आहे. तुम्ही ठरवून दिलेला विषय मी वाचू का? तसेच, सरकार विरोधकांचा अपमान करत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पळ काढत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
किरेन रिजिजू यांनी काँग्रेसचे नवे खासदार पवन खेरा यांच्यासंदर्भात भाष्य केले. काँग्रेस अध्यक्ष नवीन सदस्यांना बोलण्याची संधीच देत नाहीत, यामुळे खेरा यांना अद्याप स्वागतपर भाषणही करता आलेले नाही, असा टोला रिजिजू यानी लगावला. यावर खर्गे म्हणाले, पवन खेरा हे शिक्षित आणि सन्माननीय नेते आहेत. पूर्वसूचना न देता त्यांच्यावर अशा पद्धतीने बोलणे नियमांच्या विरोधात आहे.दरम्यान, लोकशाहीत कामकाज रोखणे अथवा विरोध करणे, हाही लोकशाही प्रक्रियेचाच भाग आहे. या, भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या जुन्या वक्तव्याची आठवणही खर्गे यांनी यावेळी करून दिली. तसेच, गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः सभागृहात यावे आणि उत्तर द्यावे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या

Back to top button