अमोल झंवर स्मृती प्रित्यर्थ झंवर परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

अमरावती/11 मे: घनश्याम नगर परिसरातील रहिवासी सुरेश झंवर परिवाराने आपल्या मुलाच्या निधनानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक परिवारांना अनेक परिवारांना स्वावलंबी जीवनासाठी सहकार्य केले.
डॉ. गोविंद कासट मित्र मंडळींनी सुचवलेल्या दोन भगिनींना शिलाई मशीन एक भगिनीला शेवया तयार करण्याचे मशीन तर पॉलीटेक्निकच्या एका होतकरू विद्यार्थ्याला लॅपटॉप प्रदान करण्यात आले. मित्रमंडळातील अनुक्रमे उमेश व ज्योति वैद्य माजी नगरसेविका सुनंदा खरड रविकांत व सुषमा काकडे मुख्याध्यापक दिलीप सदार यांनी सुचवलेल्या या लाभार्थ्यांसह राजभवन साईनगर येथे झालेल्या कार्यक्रमास सुरेश झंवर रूपराम झंवर विजय प्रकाश चांडक सह झंवर परिवारातील मंडळी माता भगिनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या गोष्टी समाजात रुजू व्हावे इतरांना प्रेरणादायी ठरावे या उद्देशातून झंवर परिवाराने वस्तु परस्परसंबंधित यांच्या घरी पोहोचून द्या असे सांगितल्यावरही आग्रहपूर्वक या कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट यांनी केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button