अमरावतीत बोगस हेल्मेटचा पर्दाफाश
रेल्वे स्टेशन रोडवरील शीतल लॉजमध्ये पोलीस-आरटीओची संयुक्त धाड; बिहारमधील 4 जण ताब्यात

अमरावती /29 जुलै- रस्ते सुरक्षेशी जोडलेला गंभीर विषय मांडणार्या मंडल मीडिया हाऊसच्या वृत्ताचा मोठा दणका बसला आहे. शहरात खुलेआम विक्री होत असलेल्या अत्यंत हलक्या आणि निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटबाबत दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध व प्रसारित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त मोहीम राबवून रेल्वे स्टेशन रोडवरील ‘शीतल लॉज’वर छापा टाकला. या कारवाईत दोन गोदामांतून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद ‘दिल्लीमेड’ हेल्मेट जप्त करण्यात आले आहेत.
एका बुक्क्यात हेल्मेट फुटले!-कारवाईदरम्यान अधिकार्यांनी जप्त केलेल्या हेल्मेटच्या मजबुतीची प्रत्यक्ष पाहणी केली. एका अधिकार्याने केवळ 1 बुक्का मारताच हे हेल्मेट जागच्या जागी फुटले! यामुळे हे हेल्मेट सुरक्षेच्या निकषांवर पूर्णपणे अपयशी ठरत असून अपघाताच्या वेळी चालकाचा जीव वाचवण्याऐवजी त्याच्या जीवावर बेतू शकतात, हे स्पष्ट झाले आहे.
मानकांचे उल्लंघन; खडख मार्कची चौकशी सुरू-ठढज व पोलीस अधिकार्यांनी जप्त केलेल्या हेल्मेटचे खडख प्रमाणपत्र, बिल, वाहतूक नोंदणी आणि उत्पादनाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तपासात हे हेल्मेट बनावट किंवा भारतीय मानके ब्यूरोच्या (इखड) नियमांचे उल्लंघन करणारे आढळल्यास, संबंधितांवर मोटर वाहन कायदा व बीएसआय च्या कडक कलमांखाली गुन्हे दाखल केले जातील.
या अधिकार्यांनी केली कारवाई-ही धडक कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे, सिटी कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक शरयू उबाले, परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक प्रमोद गोटे, सहायक मोटर वाहन निरीक्षक कांचन जाधव तसेच पोलीस व आरटीओ कर्मचार्यांच्या पथकाने केली.
नागरिकांना उच्च दर्जाचेच हेल्मेट वापरण्याचे आवाहन-अशा प्रकारचे निकृष्ट हेल्मेट केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी चालकांकडून खरेदी केले जातात, परंतु अपघातात हे हेल्मेट डोक्याला सुरक्षा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरतात. त्यामुळे नागरिकांनी केवळ प्रमाणित (खडख मार्क) हेल्मेटच खरेदी करावे आणि अशा प्रकारच्या बनावट हेल्मेट विक्रीची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे. या कारवाईमुळे शहरात इतर ठिकाणी तात्पुरते दुकान थाटून हलके हेल्मेट विकणार्यांचे धाबे दणाणले आहेत.




