अचलपूर-परतवाड्यात ‘सेक्स स्कँडल’चा पर्दाफाश
एका युवकाचे 6 युवतींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल

आरोपी युवक परतवाड्याचा कुटुंबासह फरार, शोध सुरू
भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पीडितांना तक्रार करण्याचे पोलीसांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून थेट दखल, ग्रामीण पोलिसांना स्युमोटो घेऊन तपासाचे आदेश
109 अश्लील व्हिडीओची शक्यता
परतवाडा /13 एप्रिल: सध्या नाशिकमध्ये कथित ज्योतिषी अशोक खरात याने अनेक प्रतिष्ठित कुटुंबांतील महिला आणि युवतींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गाजत असतानाच, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातही तशाच प्रकारचे, किंबहुना त्याहूनही गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका युवकाने वेगवेगळ्या समाजातील अनेक युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले आणि त्या आक्षेपार्ह क्षणांचे अश्लील व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत या संबंधित युवकाचे सुमारे 6 युवतींसोबतचे अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र, या स्कँडलला बळी पडलेल्या युवतींची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका-हे प्रकरण समोर येताच
नराधम अयान अहमद ’या’तरुणावर कलमांनुसार गुन्हे दाखल.
परतवाडा पोलिसांनी आरोपी अयान अहमद तनविर अहमद याच्याविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 294 अन्वये अश्लील कृत्ये केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तसेच, या प्रकरणातील पीडितांपैकी काही मुली अल्पवयीन असल्याने बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) मधील कलम 8 आणि 12 नुसार लैंगिक हल्ल्याचे आणि शोषणाचे गुन्हे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, इंटरनेटचा गैरवापर करून अश्लील साहित्य प्रसारित केल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 67 आणि 67 (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कलमांमुळे आरोपीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी पुराव्यांसह तपास चक्रे वेगवान करून आरोपीला अटक करण्यासाठी पथके तैनात केली आहेत.
संघटनांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पोस्ट करून या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, अचलपूर किंवा परतवाडा पोलीस ठाण्यात अद्याप एकाही पीडितेने अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. दरम्यान, ज्या युवकाचे नाव या प्रकरणात समोर येत आहे, तो आपल्या कुटुंबासह शहरातून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे तपासाचे आदेश-राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत ग्रामीण पोलीस अधीक्षकांना ’स्युमोटो’ (स्वतःहून दखल घेऊन) कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष नेहा अभय वाजपेयी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यांच्या दाव्यानुसार, आरोपीने या भागातील 100 हून अधिक युवतींना जाळ्यात ओढले, त्यांचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांचे लैंगिक शोषण केले.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन: घाबरू नका, पुढे
या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक वि विशाल आनंद यांनी सांगितले की: जर कोणत्याही पीडितेला बदनामीच्या भीतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची नसेल, तर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी गुप्तपणे संपर्क साधावा. महिला पोलीस कर्मचार्यांमार्फत त्यांच्या तक्रारी आणि जबाब नोंदवले जातील. पीडितांची नावे आणि पत्ते पूर्णपणे गुप्त ठेवले जातील आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.
मोठे रॅकेट सक्रिय असल्याची भीती
आरोपी युवकाने व्हॉट्सप आणि स्नॅपचॅटवर ग्रुप तयार करून अल्पवयीन मुले-मुलींचे नंबर मिळवले होते. हे नंबर एका विशिष्ट समुदायाच्या तरुणांना दिले जात होते, ज्याद्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे मोठे रॅकेट काम करत होते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे
.काही आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले
परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनीही पुष्टी केली आहे की, काही आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले असून त्यातील युवक-युवती स्थानिक असल्याची माहिती मिळत आहे, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.




