20 बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या

अमरावती ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट

अनेक ठाण्यांना मिळाले नवे प्रभारी अधिकारी

अमरावती / 3 जानेवारी : जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रशासकीय फेरबदल करत 20 बड्या पोलीस अधिकार्‍यांच्या तात्काळ बदल्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश असून अनेक महत्त्वाच्या ठाण्यांना नवे प्रभारी मिळाले आहेत.पोलीसा प्रशासनातील प्रशांत मसराम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, आधार सिंग सोनोने यांच्या कडे जिल्हा विशेष शाखा, अशोक लांडे यांच्याकडे सायबर सेल, तर नितीन देशमुख यांच्याकडे जिल्हा वाहतूक शाखेची धुरा सोपवण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्तरावर अमन सिरसट (शिरजगाव कसबा), सचिन पवार (कुर्‍हा), संजय आत्राम (मंगरुळ चव्हाळा), शरद आहेर (मंगरुळ दस्तगीर), अभय चौथनकर (पथ्रोट) आणि वैभव महांगरे (खोलापूर) यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.पोलीस अधीक्षकांनी या बदल्यांबाबत कडक भूमिका घेतली असून, कोणत्याही सबबी न सांगता सर्व अधिकार्‍यांनी तात्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button