तुकाराम मुंढे यांची बदली थांबवा
अभिनेते परेश रावल यांचे थेट देवेंद्र फडणवीस यांना आवाहन; पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई /10 ऑगस्ट -अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’द’ वर एक पोस्ट करत आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत, तुकाराम मुंडे यांची त्यांच्या विभागातून बदली न करण्याची आग्रही विनंती केली आहे. सध्या तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या विभागातही त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चाही रंगते आहे. त्यामुळेच परेश रावल यांनी आता थेट फडणवीसांना साकडे घातले आहे.परेश रावल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, अत्यंत नम्रता आणि आदराने सांगायचे झाले तर, आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांचे रक्षण करणे आणि त्यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा हकालपट्टी होणार नाही याची काळजी घेणे हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राधान्य आणि ’धर्म’ असले पाहिजे.
राजधानी असलेल्या रांची येथे, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जसंदर्भात आता काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे संयुक्त सरकार आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवरून आणि पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, झारखंडमध्ये आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पुद्धतीने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि केवळ संवादातूनच तोडगा निघू शकतो. झारखंड सरकारने या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे आणि सर्व समस्यांवर तत्काळ सोडवायला हव्यात




