बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही

कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही

जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

मुंबई/11 ऑगस्ट : मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्राच्या संदर्भाने त्यांचा दौरा सुरु आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील सरकारसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. बावनकुळे आमची कुणबी प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोपा देखील जरांगे पाटलांनी केलाय. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री म्हणून कर्तव्य केले आहे. त्यांना अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही. ओबीसी आहेत म्हणून टार्गेट करणं महाराष्ट्राला शोभणार नाही असेही ते म्हणाले. कोणाचेही प्रमाणपत्र रद्द केलेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
सरकार संविधानाने चालते. सर्वांचे म्हणने ऐकूण घेतले जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संविधानाच्या चौकटीत बसत असेल तर न्याय देऊ. एकाच्या ताटातले काढून दुसर्‍याला देणार नाही. मराठा, ओबीसी, एससी सर्व समान आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ॠउउ इकॉसिस्टिम तयार करायची आहे. आज समीटमध्ये चर्चा झालेली आहे. पुणे उद्योगाची राजधानी बनेल असेही ते म्हणाले. चाकण येथील खड्डे संदर्भात इंडस्ट्रीयल टाऊनशिपचा दर्जा दिला जाईल असे ते म्हणाले. पुणे नाशिक रेल्वे संदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. पालघर प्रकल्पासंदर्भात दुग्ध विकास विभागाची जागा संपादित आहे. सर्व जागा मालकाना पैसे दिले आहेत. उदयोगसाठी पोषक वातावरण महाराष्ट्रात तयार करणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 1500कोटींची गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जास्तीचा एफएसआय, पायाभूत सुविधा देणार आहोत असेही ते म्हणाले. पुढील 1000 दिवसामध्ये अर्टिफिसिअल इंटेलिजन्समुळे नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य सरकार विद्यापीठे किंवा केंद्र सरकार या संदर्भात काम करत आहेत. कौशल्य शिक्षणासाठी आपण प्रोत्साहन देत आहोत असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button