बारामतीत सुनेत्रा पवारांचा ‘विराट’ विजय निश्चित

97 टक्के मते मिळणार, रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोलचा अहवाल

पुणे/29 एप्रिल: राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या पार्श्वभूमीवर, ’रिंगसाईड रिसर्च’ या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या अंदाजानुसार, दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी एकतर्फी वर्चस्व गाजवले असून, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सत्ताधारी पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र लोकशाहीच्या रिंगणात ही लढत अटळ ठरली. ’रिंगसाईड रिसर्च’च्या आकडेवारीनुसार, बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना अक्षरशः डोक्यावर घेतले असून त्यांना 92 ते 97 टक्के इतके अभूतपूर्व मतदान मिळण्याचा अंदाज आहे. जर हा अंदाज प्रत्यक्ष निकालात उतरला, तर महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील हे आजवरचे सर्वात मोठे रेकॉर्डब्रेक मताधिक्य ठरेल. इतर उमेदवार आणि ’नोटा’च्या पारड्यात केवळ 3 ते 8 टक्के मते जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सुनेत्रा पवार यांनी बारामतीचा बालेकिल्ला केवळ राखलाच नाही तर तो अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही महायुतीचाच ’गजर’ पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेल्याचे एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अक्षय कर्डिले यांना 78 ते 83 टक्के मतदारांनी कौल दिला असून त्यांनी विजयाचे मोठे अंतर निश्चित केले आहे. त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना अवघी 7 ते 9 टक्के मते मिळताना दिसत

संबंधित बातम्या

Back to top button