अमित शाहांचं भाषण पूर्ण ऐकलं असतं तर त्यांची थोबाडं काळी झाली असती

मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

मुंबई/15 सप्टेंबर-  दोन दिवसापूर्वी नवी मुंबईत राजभाषा संमेलन पार पडले. या संमेलनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली. यावेळी शाह यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधानावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर टीका केली.
विरोधकांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. अमित शाह काय बोलले हे विरोधकांनी पूर्ण ऐकले असते, तर त्यांची थोबाडं काळी झाली असती, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. दोन दिवसापूर्वी नवी मुंबईत राजभाषा संमेलन पार पडले यावेळी अमित शाह म्हणाले होते, महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी बहुभाषिक भूमी आहे. आपल्या मातृभाषेसोबतच दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्यास विरोध करणारे लोक एक प्रकारे पाप करत आहेत, असे विधान अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवला. राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करुन टीका केली.

सलेक्टिव्ह ऐकून टीका करणे बंद करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांनी अमित शाह यांचे संपूर्ण भाषण शांतपणे ऐकले असते, तर अशी टीका करण्याची वेळच आली नसती. महाराष्ट्रात मराठी भाषेचे स्थान किती महत्त्वाचे आणि योग्य आहे, हेच अमित शाहांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यांनी मातृभाषेच्या महत्त्वावरच प्रामुख्याने भर दिला होता.

Back to top button