इलेक्ट्रिक वाहनांची टोल वसुली बंद करा

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या (मंगळ वार, 10 डिसें बर) तिसर्‍या दिव साच्या काम काजात भाजपाचे शंकर जगताप यांनी इलेक्ट्रिक वाहन चालकांकडून करण्यात येणार्‍या टोल वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर नाना पटोले, वरुण सरदेसाई यांनी सुद्धा याबाबत प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू (शिवडी-नावा शेवा लिंक) या मार्गांवर प्रवासी ई-वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली होती. तरीही ऑगस्टपर्यंत अनेक टोल प्लाझांवर टोल आकारणी सुरूच असल्याची तक्रार आमदारांनी मांडली. आमदारांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलवसुलीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. पण त्यांच्या उत्तरावर थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश दिले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button