पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती/11 नोव्हेंबर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. दौर्‍यानुसार, बावनकुळे दुपारी 3.15 वाजता भगवान बिरसा मुंडा यांच्या 151व्या जयंती व दिवाळीनिमित्त निमकुंड, ता. अचलपूर येथे आदिवासी कोरकू बांधवांची भेट घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता वडरपुरा, अमरावती येथे कामगार, मजूर, आदिवासी, गरजू शेतकरी व शेतमजूरांसोबत ’दिवाळी मिलन’ कार्यक्रमात सहभागी होतील. सायंकाळी 7 वाजता अमरावती येथून नागपूरकडे रवाना होतील.

Back to top button