प्रहार तर्फे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा

माजी आमदार बच्चू कडू यांची उपस्थीती

चांदूरबाजार /2 जून: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन शनिवार 31 मे रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणार्‍या स्त्रीशक्तीच्या प्रतीक आहे. न्यायनिष्ट, धर्मनिष्ठ आदर्श राज्यकारभाराची उभारणी तसेच धर्म व संस्कृती पुनरुज्जीवन करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती अर्थात त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे 31 मे रोजी महाराष्ट्र मध्यप्रदेश तसेच देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरी करण्यात आले आहे. चांदुर बाजार शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुरुवात फोटो चे पूजन व हारार्पण करून करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार बच्चू कडू , प्रहार तालुका अध्यक्ष संतोष कीटूकले, मंगेश देशमुख, विनोद कोरडे, दीपक भोगाडे, सचिन खुळे, गजानन ठाकरे, शिशिर माकोडे, प्रवीण तडस, विशाल आवारे, प्रशांत देवतळे, आदी प्रहार कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button