दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी भव्य सामूहिक विवाह सोहळा
स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे

8 फेब्रुवारी 2027 रोजी शुभविवाहचे आयोजन
नोंदणीची अंतिम तारीख 25 जाने.2027 निश्चित
अमरावती /1 नोव्हेंबर – निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळी संकटात होरपळणार्या शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देत त्यांच्या मुलामुलींचे लग्न थाटामाटात लावून देण्यासाठी स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार 28 फेब्रुवारी 2027 रोजी अमरावतीच्या पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुलात भव्य मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गरजू वधूवरांनी 25 जानेवारी 2027 पर्यंत नाव नोंदणी करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
शेतात दिवसरात्र राबणार्या बळीराजावर निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाचे सावट पसरले असून संसाराचा गाडा ओढताना मुलामुलींचे हात पिवळे कसे करायचे या विवंचनेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना मोठा हातभार लावण्यासाठी हा भव्य सोहळा आकारास येत आहे. या सामाजिक उपक्रमामुळे गरीब शेतकरी कुटुंबांवरील वाढत्या लग्नखर्चाचा डोंगर हलका होऊन लग्नसराईचा डोलारा सन्मानाने उभा राहण्यास मोठी मदत लाभणार आहे.
या सामाजिक बांधिलकीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून ट्रस्टने यापूर्वी 2005 मध्ये 2100 दांपत्यांचे तर 2006 मध्ये तब्बल 3100 दांपत्यांचे विवाह यशस्वीपणे लावून दिले होते. त्याकाळी प्रत्येक जोडप्याला ट्रस्टकडून 10 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्वतः या सोहळ्यास हजेरी लावून उपक्रमाचे कौतुक केले होते तसेच शासनाकडून प्रत्येक दांपत्यासाठी 11 हजार रुपयांचे आर्थिक अनुदान जाहीर करून या सामाजिक मोहिमेला बळ दिले होते.
या भव्य सोहळ्यात प्रत्येक जोडप्याचा विवाह पूर्ण पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक विधीनुसार सन्मानाने लावला जाणार असून स्वतंत्र भटजींची उत्तम सोय केली जाईल. तसेच वधूवरांना नवीन कपडे, मंगळसूत्र, ओढणी, दुपट्टा, जाकीट, चपला आणि बूट असे सर्व आवश्यक संसारोपयोगी साहित्य ट्रस्टकडून मोफत दिले जाईल. सोहळ्यास उपस्थित राहणार्या पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था असेल तसेच प्रत्येक जोडप्यासोबत वधूकडील 5 आणि वराकडील 5 अशा एकूण 10 नातेवाइकांसाठी स्वतंत्र बैठकीची उत्तम सोय केली जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्या वधूवरांनी आवश्यक कागदपत्रांसह आ. प्रवीण पोटे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन वेळेत नोंदणी करावी. या नोंदणीसाठी 25 जानेवारी 2027 ही शेवटची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या सामाजिक सोहळ्याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि विवाह समितीचे बबनराव आवारे, संतोषराव काळपांडे, विवेक हाडोळे, भारतराव खांडे, दत्ताभाऊ कुचे, नितीन कडू, संजयराव काळे, सुदाम पंडागरे, पंजाबराव पवार, लक्ष्मीकांत तायडे, विजय गवळीकर, सतीशराव राऊत, अनिल मलमकर, ज्ञानेश वणवे, घनश्याम पेठे, रवींद्र अंबलकार, शशिकांत कोकाटे, विजय उभाड, ज्ञानदीप येवले, आशिष धाडे, दिलीपराव निंभोरकर, बबनराव लायदे, राम खंडारे, दिलीपभाऊ निंभोरकर, प्रकाश पुंड, डी. निकम, अक्षय पोटे, श्रेयस पोटे पाटील, श्रुतीताई पोटे पाटील, संदीप जाधव, आकाश कदम, रामदेव जोशी, अमोल काळे, सुरेश पठारे, रोहित देशमुख यांनी केले आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी 7499022313 किंवा 7499036153 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
नोंदणीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
सोहळ्यात नाव नोंदवण्यासाठी वधू आणि वर दोघांचे अधिकृत ओळखपत्र आवश्यक राहील. सोबत रीतसर प्रतिज्ञापत्र, गावच्या ग्रामपंचायतीचा दाखला, पोलीस पाटील यांचा दाखला आणि शेतजमिनीचा सातबारा उतारा सादर करावा लागेल. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आ. प्रवीण पोटे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात 25 जानेवारी 2027 पर्यंत आपली अधिकृत नोंदणी पूर्ण करावी.
सोहळ्यातील वधूवरांना मिळणार्या मोफत सुविधा
या भव्य सामूहिक सोहळ्यात प्रत्येक जोडप्यासाठी स्वतंत्र भटजींची व्यवस्था करून पारंपरिक पद्धतीने विवाह लावले जातील. वधूवरांना कपडे, मंगळसूत्र, ओढणी, दुपट्टा, जाकीट, चपला आणि बूट मोफत मिळतील. तसेच वर्हाडी मंडळींसाठी चवदार भोजनाची सोय असून प्रत्येक जोडप्यासोबत दोन्ही बाजूंच्या एकूण 10 नातेवाइकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था सन्मानपूर्वक केली जाईल.





